शहाजी पुत्र थोरले संभाजी राजे
लेख लिहिण्या मागचे कारण म्हणजे आपल्या सर्वांना शहाजीराजे, शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या विषयी बरीच माहिती असेल परंतु बऱ्याच जणांना थोरल्या संभाजी राजे विषय माहिती नसेल. थोरले संभाजी राजे म्हणजे शहाजी राजे यांचे थोरले पुत्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे मोठे बंधू होय.
तर जाणून घेऊ थोरल्या संभाजी महाराजांच्या बदल
थोरल्या संभाजी राजेंचा उल्लेख हा आपल्या जास्त करून शिवाजी महाराजांनी केलेल्या अफजलखान वधाच्या वेळेस दिसुन येतो. याच अफजलखानाने कनकगीरीच्या लढाईत दगाफटका करून थोरल्या संभाजी राजेंना मारलं.
इ. स. १६२३ रोजी शहाजी राजे आणि जिजाऊ यांच्या पोटी थोरल्या संभाजी राजें जन्म झाला. पुढे थोरल्या संभाजी महाराजांचा विवाह विजयराव विश्वासराव (पवार कुळातील) यांची मुलगी जयंतीबाई यांच्या बरोबर शिवनेरी किल्ल्यावर झाला. नंतर संभाजी महाराज जयंतीबाई यांच्या बरोबर कर्नाटक प्रांतात वास्तव्यास गेले. संभाजी राजे आणि जयंतीबाई यांना पुत्र (उमाजी राजे) झाला. संभाजी महाराजांची सर्व कारकीर्द आपल्याला कर्नाटक आणि बेंगळुरू प्रांता दिसते. आपल्या वडलांनाबरोबर (शहाजीराजे) बरोबर कर्नाटक प्रांतात आदिलशाहीत राहून बंधू शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या निर्मिती साठी मदत करत होते. या दरम्यान शिवाजी महाराजांना पुणे तर बंधू संभाजी राजे यांना बेंगळुरूची जहागिरी देण्यात आली. बेंगळुरूची जहागीर संभाजी राजे हे शहाजी राजे यांच्या मार्गदर्शनाखाली तर शिवाजी महाराज हे आई जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याची जहागीर चालवत होते.
थोरले संभाजी महाराज कर्नाटकात राहून वडील शहाजीराजे यांच्या बरोबर शिवाजी महाराजांना मदत करत होते. याच दरम्यान थोरले संभाजी राजे ही आपल्या तलवारीच्या जोरावर आदिलशाहीत पराक्रम गाजवत होते. शिवाजी महाराजांनी ही आदिलशहाचा भूप्रदेश ताब्यात घेऊ लागले होते. यामुळे आदिलशाही पूर्ण पणे हतबल झाली होती कारण याआधी आदिलशाही ने शहाजीराजांच्या बंडखोरीचा अनुभव घेतला होता. या सगळ्याविरुद्ध विजापूर दरबारात चर्चा चालू झाली आणि शिवाजी महाराजांना अटकाव करायचे असेल तर प्रथम शहाजी राजेंना अटक केली पाहिजे, असा कट शिजला आणि २५ जुलै १६४८ या दिवशी आदिलशाहीचा वजीर मुस्तफाखान याने शहाजीराजेंना जिंजीजवळ कैद केले. शहाजीराजांना जिंजीला अटक केली. त्याच वेळी आदिलशाही ने एकाच वेळी इकडे कर्नाटकावर (थोरल्या संभाजी राजें वर) आणि तिकडे स्वराज्यावर (शिवाजीराजें वर) स्वारी केली. दोन्ही ठिकाणी लढाई झाली. थोरले संभाजी महाराज वाघासारखे लढले. दोन्ही ठिकाणी मराठ्यांच्या विजय झाला. परंतु शहाजीराजेंच्या सुटकेच्या बदल्यात शिवाजी महाराजांनी आदिलशहास सिंहगड किल्ला, शिरवळ मधील काही भाग दिला तर संभाजीराजेंनी बंगळूर शहर, कंदीपिली किल्ला आणि काही मुलुख दिला.
पुढे सन १६५४ साली कनकगिरीच्या पाळेगार आपाखानाने आदिलशाहीविरुद्ध बंड पुकारले होते. यावेळी आदिलशाहीच्या आदेशानुसार संभाजीराजे व अफजलखान हे एकत्र आपाखान वर चालून गेले. याच युद्धात अफजलखानाने संभाजी राजे बरोबर दगाफटका केला. या दग्यामुळे संभाजीराजेंचा रणांगणावर तोफेचा गोळा लागून मृत्यू झाला. आजही संभाजीराजेंची समाधी कनकगिरी येथे आहे.
:- विशाल जगदाळे

अत्यंत महत्वपूर्ण माहिती विशाल तू दिली आहेस, थोरल्या संभाजी महाराजांचा इतिहास आणखीन लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, तू त्यासाठी प्रयत्न केलेस त्याबद्दल तुझी खुप खुप कौतुक.
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteमस्त 👍👍👍👍👍🚩⛳✌👌👍✅
ReplyDeleteधन्यवाद
Delete