Friday, May 28, 2021

शहाजी पुत्र थोरले संभाजी राजे

 शहाजी पुत्र थोरले संभाजी राजे


लेख लिहिण्या मागचे कारण म्हणजे आपल्या सर्वांना शहाजीराजे, शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या विषयी बरीच माहिती असेल परंतु बऱ्याच जणांना थोरल्या संभाजी राजे विषय माहिती नसेल. थोरले संभाजी राजे म्हणजे शहाजी राजे यांचे थोरले पुत्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे मोठे बंधू होय. 


तर जाणून घेऊ थोरल्या संभाजी महाराजांच्या बदल 


थोरल्या संभाजी राजेंचा उल्लेख हा आपल्या जास्त करून शिवाजी महाराजांनी केलेल्या अफजलखान वधाच्या वेळेस दिसुन येतो. याच अफजलखानाने  कनकगीरीच्या लढाईत दगाफटका करून थोरल्या संभाजी राजेंना मारलं.


इ. स. १६२३ रोजी शहाजी राजे आणि जिजाऊ यांच्या पोटी थोरल्या संभाजी राजें जन्म झाला. पुढे थोरल्या संभाजी महाराजांचा विवाह विजयराव विश्वासराव (पवार कुळातील) यांची मुलगी जयंतीबाई यांच्या बरोबर शिवनेरी किल्ल्यावर झाला. नंतर संभाजी महाराज जयंतीबाई यांच्या बरोबर कर्नाटक प्रांतात वास्तव्यास गेले. संभाजी राजे आणि जयंतीबाई यांना पुत्र (उमाजी राजे) झाला. संभाजी महाराजांची सर्व कारकीर्द आपल्याला कर्नाटक आणि बेंगळुरू प्रांता दिसते. आपल्या वडलांनाबरोबर (शहाजीराजे) बरोबर कर्नाटक प्रांतात आदिलशाहीत राहून बंधू शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या निर्मिती साठी मदत करत होते. या  दरम्यान शिवाजी महाराजांना पुणे तर बंधू संभाजी राजे यांना बेंगळुरूची जहागिरी देण्यात आली. बेंगळुरूची जहागीर संभाजी राजे हे शहाजी राजे यांच्या मार्गदर्शनाखाली  तर शिवाजी महाराज हे आई जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याची जहागीर चालवत होते. 


थोरले संभाजी महाराज कर्नाटकात राहून वडील शहाजीराजे यांच्या बरोबर शिवाजी महाराजांना मदत करत होते. याच दरम्यान थोरले संभाजी राजे ही आपल्या तलवारीच्या जोरावर आदिलशाहीत पराक्रम गाजवत होते. शिवाजी महाराजांनी ही आदिलशहाचा भूप्रदेश ताब्यात घेऊ लागले होते.  यामुळे आदिलशाही पूर्ण पणे हतबल झाली होती कारण याआधी आदिलशाही ने शहाजीराजांच्या बंडखोरीचा अनुभव घेतला होता. या सगळ्याविरुद्ध विजापूर दरबारात चर्चा चालू झाली आणि शिवाजी महाराजांना अटकाव करायचे असेल तर प्रथम शहाजी राजेंना अटक केली पाहिजे, असा कट शिजला आणि २५ जुलै १६४८  या दिवशी आदिलशाहीचा वजीर मुस्तफाखान याने शहाजीराजेंना जिंजीजवळ कैद केले. शहाजीराजांना जिंजीला अटक केली. त्याच वेळी आदिलशाही ने एकाच वेळी इकडे कर्नाटकावर (थोरल्या संभाजी राजें वर) आणि तिकडे स्वराज्यावर (शिवाजीराजें वर) स्वारी केली. दोन्ही ठिकाणी लढाई झाली. थोरले संभाजी  महाराज वाघासारखे लढले.  दोन्ही ठिकाणी मराठ्यांच्या विजय झाला. परंतु शहाजीराजेंच्या सुटकेच्या बदल्यात शिवाजी महाराजांनी आदिलशहास सिंहगड किल्ला, शिरवळ मधील काही भाग दिला तर संभाजीराजेंनी बंगळूर शहर, कंदीपिली किल्ला आणि काही मुलुख दिला.


पुढे सन १६५४ साली कनकगिरीच्या पाळेगार आपाखानाने आदिलशाहीविरुद्ध बंड पुकारले होते. यावेळी आदिलशाहीच्या आदेशानुसार  संभाजीराजे व अफजलखान हे एकत्र आपाखान वर चालून गेले. याच युद्धात अफजलखानाने संभाजी राजे बरोबर दगाफटका केला. या दग्यामुळे संभाजीराजेंचा रणांगणावर तोफेचा गोळा लागून मृत्यू झाला.  आजही संभाजीराजेंची समाधी कनकगिरी येथे आहे.

:- विशाल जगदाळे



Friday, December 4, 2020

एक तरी मैत्रीण असावी...

 एक तरी मैत्रीण असावी...


तिच्याशी मनातलं सर्व काही

share करता यावं

आपलं यश अपयश सर्व

मोकळेपणाने सांगता यावं!!


मैत्रीची तत्व जपणारी 

आणि जपायला शिकवणारी

नात्याला उजाळा देणारी 

आणि स्वप्नांना दिशा दाखवणारी!!


रिप्लाय उशिरा देणारी

पण थेट मेसेज करणारी

सर्व नोट्स हक्काने मागणारी

आणि doubt विचारणारी!!


हडळ म्हणून चिडवलं

की लगेच चिडणारी 

online नसलो की

मित्रांकडे चौकशी करणारी!!


राग आला तरी स्वतः समजून घेणारी 

आणि मला ही समजून सांगणारी

काही झालं की बोलणं बंद करणारी

तरी पण वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी!!


सुखाबरोबर दुःखात सुद्धा साथ देणारी

संकटात असताना मदत करणारी

माझ्या मनातील सर्व भावना जपणारी

नकळतपणे काही सुखाचे क्षण आणणारी!!


:- विशाल जगदाळे

Sunday, May 10, 2020

आठवण

आठवण

आठवण येते कधी मला
आणि गालावर खुदकन खळी पाडते...
तर कधी हसता हसता
डोळी माझ्या पाणी आणते...

गर्दीत राहून सुध्दा ती
एकांताचा भास देते...
अन एकांतात गेली तरी मला
नाही कधी एकटे सोडते...

डोळे बंद केल्यावर
नवे जग दाखवते...
अन डोळे उघडले
तरी धुंद करून टाकते...

दूर लोटायचा प्रयत्न केला
तर अधिकच जवळ येवून बसते...
जवळ तिला बोलावले तर मात्र
कोपऱ्यात कुठे दडून बसते...

हिच आहे माझी खरी मैत्रीण
नेहमी साथ देणारी...
आंगतुक असली तरी
हवी हवीशी वाटणारी...


     
आईच्या प्रेमाला मोल नाही

       आईच्या प्रेमाला कशाची तुलना नाही. म्हणून तर कुणापुढेही न वाकलेला जगविजेता सिकंदर हा देखील आपल्या आईसमोर नतमस्तक होत असे. वात्सल्याचे स्वरूप सर्वत्र सारखेच दिसून येते, त्यात गरीब-श्रीमंत श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव नसतो. आईच्या प्रेमात दिक्कालाच्या अडचणीही नसतात.
  
      एखादी श्रीमंत माता आपल्या मुलाचे जेवढे लाड करील, त्याला जेवढया महाग किमतीच्या वस्तू आणून देईल, तेवढ्या भारी वस्तू गरीब माता आपल्या लेकराला देऊ शकणार नाही हे खरे पण म्हणून काही तिच्या प्रेमाचे मोल कमी ठरणार नाही. वात्सल्याची अनेक उदाहरणे आपल्या सर्वांच्या ओळखीची आहेत. चार घरी हिंडून भाकर-तुकडा गोळा करून आणणारी भिकारीण स्वतः उपाशी राहते मात्र आपल्या लेकराला तो ओला-कोरडा तुकडा आधी भरविते. प्रसंगी अपत्य रक्षणासाठी आई आपल्या प्राणांची ही बाजी लावते. इतिहासातील याचे जिवंत स्मारक म्हणजे रायगडावरील हिरकणी बुरुज.

      आई आपल्या लेकरासाठी काय करीत नाही? ती त्याला जन्म देते एवढेच नव्हे तर सर्वस्वी परावलंबी असलेल्या आपल्या बाळाला ती नयनाचा दिवा व तळहातांचा पाळणा करून सर्वतोपरी सांभाळते त्याचबरोबर त्याला नितीकथा, चतुर्यकथा, सांगून ती त्याचे कोमल मन फुलविते आणि त्यावर सुसंस्कार करते. मातेचा विशेष सहवास न लाभलेल्या दुर्देवी बालकाला ह्या साऱ्या सौभाग्याला वंचीत व्हावे लागते. शिवबा, विनोबा यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या मतेलाच दिले आहे.

        अपंग, मतिमंद कसेही बालक असले तरी ती आपली माया कमी करीत नाही. किंबहुना अशा बालकाबद्दल तिला वाटणारा कळवळा अधिकच उत्कट असतो.

         आईशिवाय दुर्गुणी मुलाचा अन्य कोणी वाली नसतो. घरोघरी सर्वत्र त्याला अपमानित करतात. प्रत्यक्ष जन्मदाता पिताही त्याला घराबाहेर काढतो. अशा वेळी ती आई मात्र आपल्या मुला जवळ करते म्हणून तर म्हणतात.
           
           "स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी"

         आईचे हे अनेक उपकार आपण कधीही फेडू शकत नाही. आईचे कृपाछत्र एवढे विशाल आई आहे, हे उपकार एवढे आहेत की सात जन्म काय शंभर वेळाजन्म घेऊन ही ते फिटणार नाहीत.  
   
          जननी हे दैवत असे असामान्य आहे की, कोणत्याही फळाची अपेक्षा न करता ते आपल्यावर कृपाप्रसादाची खैरात सदैव करीत असते.

Wednesday, April 29, 2020

प्रेम म्हणजे काय...

प्रेम म्हणजे काय...

प्रेम म्हणजे डोळे बंद करावे
आणि तुझेच स्वप्न दिसावे
               त्या एका स्वप्नासाठी
              दिवस रात्र एक करावे

प्रेम म्हणजे डोळे बंद करावे
आणि तुझे निरागस डोळे दिसावे
       डोळ्यातल्या त्या काजळा मागे
        तुझे लपलेले सर्व दुःख दिसावे

प्रेम म्हणजे डोळे बंद करावे
आणि तुझ्या आठवणीत रमावे.
             त्या एका आठवणीसाठी
             दिवस रात्र झुलावे.

प्रेम म्हणजे डोळे बंद करावे
आणि तुझेच रूप दिसावे.
             त्या सुंदर रूपा मध्ये सर्व विसरावे
             आणि तुझ्यात आठवणीत रमावे
       
प्रेम म्हणजे डोळे बंद करावे 
आणि तुझे गुलाबी ओठ दिसावे
           त्या अबोल ओठा मधले
            तुझे स्वर आठवावे

:-विशाल जगदाळे
  

Wednesday, December 4, 2019

शिवप्रताप दिन 

1) प्रतापगडावर

अफजलखानाचा वध 

शिवप्रताप दिन.... शिवरायांनी अफजलखानाचा वध केल्याचा दिवस म्हणून शिवप्रतापदिन सोहळा प्रतापगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी ढोल ताशांच्या गजरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. अंगावर रोमांच उभं करणाऱ्या शिवकालीन ऐतिहासिक खेळांचं प्रात्यक्षिक यावेळी सादर करण्यात आलं. भल्या पहाटे सूर्योदयाच्या साक्षीनं मंगलमय वातावरणात सुरु झालेल्या या सोहळ्यानं वातावरण भारून गेलं. यावेळी उपस्थितांनी जय भवानी, जय शिवाजीचा गजर केला. 

Tuesday, December 3, 2019


माझा महाराष्ट्र 


राज्यामध्ये महाराष्ट्र, महाराष्ट्र असे महान
या महान राष्ट्राचे आम्ही गातो गुणगान
फुलेटिळकआगरकर इथे जन्मले लाल
स्वातंत्र्यासाठी त्यांनी भोगिले किती हाल
गिरिवरती सुंदर लेणी, मंदिरे कृष्ण पाषाणी
तुकयाची अभंगवाणी, लतादिदींची मंजुळ गाणी
आनंदीबाई जोशी पहिल्या महिल्या डॉक्टर
कृष्णा पाटीलने केले शिखर एव्हरेस्ट सर
भीमा, कृष्णा, गोदावरी अन्‌ उत्तुंग सह्यगिरी
या राज्याची राजधानी माझी मुंबई नगरी
डफाच्या थापेवरती गर्जे शिवबाचा पोवाडा
जाखडी अन्‌ लावणीने सारा देश झाला वेडा
                                                 :- मराठीमाती